udclogo
अर्ज कसा करावा :  
8.1 उमेदवारांनी बँकेच्या www.akoladccbank.com या वेबसाईटवर गेल्यावर तेथे (New Recruitment/New Employment) या ऑप्शनवर क्लीक करावे. तेथे उपलब्ध झालेली लिंक उघडावी व त्या लिंक मार्फत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. इतर कोणत्याही प्रकारे / पध्दतीने केलेला अर्ज स्विकारण्यात येणार नाही. त्यानंतर भरती अधिसूचनेचे (Recruitment Notification), आवेदन शुल्क भरणा करण्याच्या चलनाचे प्रिंट घ्यावे. आवेदन शुल्क चलन स्वच्छ व वाचता येईल अशा ठळक हस्ताक्षरात  (BLOCK LETTERS) भरावे.
                   आवेदन शुल्क भरण्यासाठीचे विहित पध्दतीने भरलेले चलन जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखेत जावून योग्य ते आवेदन शुल्क The Akola District Central Co-op. Bank Ltd., Akola या नावे असलेल्या बँक खाते क्रमांक 32249219965 मध्ये रोखीने भरावेत. उपरोक्त बँक चलनाने भरण्यात येणारे आवेदन शुल्क ना परतावा पध्दतीच्या स्वरुपात आहे. त्यामुळे एकदा शुल्क भरल्यानंतर अर्जदारास कोणत्याही परिस्थितीत हे  शुल्क परत मिळणार नाही.
8.2 अर्ज करताना उमेदवाराचा स्वतःचा अधिकृत e-mail ID असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेच्या कालावधीत सदरचा e-mail क्रियाशिल (Active) असणे आवश्यक आहे.
        e-mail ID वर लेखी परीक्षेबाबत सुचना पाठविले जाण्याची शक्यता आहे. तसेच उमेदवाराने कोणत्याही परिस्थितीत स्वतःशिवाय इतर कोणाचाही e-mail वापरु नये अथवा इतर कोणास आपला e-mail ID चा पासवर्ड देवू नये.
8.3 जर उमेदवाराचा स्वतःचा अधिकृत e-mail ID नसेल तर त्याने/तिने ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्याचा/तिचा नवीन e-mail ID तयार करणे आवश्यक आहे.
8.4 उमेदवाराने आवेदन शुल्क जमा केलेल्या चलनाची प्रत बँकेच्या प्रमुखाकडून प्राप्त करुन घ्यावी. सदर प्रतीवर (अ) शाखेचा क्रमांक व शाखेचा कोड नंबर (ब) व्यवहार केल्याचा क्रमांक/खातेवही क्रमांक (Transaction ID/Journal No.) (क) रक्कम जमा केल्याची तारीख व रक्कम यांची पूर्ण नोंद असल्याची उमेदवाराने खात्री करुन घ्यावी.
8.5 उमेदवाराने रक्कम बँकेत जमा केल्यानंतर उमेदवार ऑनलाईन अर्ज करण्यास पात्र ठरेल. उमेदवाराने बँकेच्या www.akoladccbank.com या संकेतस्थळावरील पदभरतीच्या पृष्ठावर परत भेट द्यावी आणि वर नमूद केलेल्या 8.1 येथील सुचनाप्रमाणे लिंक उघडावी व ऑनलाईन अर्ज भरावा.
8.6 ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराने त्याची सर्व माहिती इंग्रजीमधून काळजीपूर्वक भरावी व योग्य त्या ठिकाणी आवेदन शुल्क चलनावरील आवश्यक माहिती भरावी व तो अर्ज सादर (Submit) करावा.
8.7 उमेदवाराने सादर केलेला On-Line अर्ज सादर स्विकारला गेल्यानंतर उमेदवारास एक Registration Number आणि Password त्याच वेळी देण्यात येईल. सदर Registration Number आणि Password उमेदवारांनी तो स्वतःकडे जपून/लिहून ठेवावा. त्याचा उपयोग प्रवेशपत्र (Hall Ticket) Download करणे किंवा अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी उपयोगात आणावयाचा आहे. या Registration Number आणि Password शिवाय संकेतस्थळावरुन पुढे पोहोचता येणार नाही.
8.8 उमेदवाराने लेखी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रा सोबत (Hall Ticket) आवेदन शुल्क भरणा केलेल्या चलनाची मुळ स्थळप्रत सादर करणे आवश्यक आहे . आवेदन शुल्क भरणा केलेल्या चलनाच्या मूळ प्रतीशिवाय उमेदवारास लेखी परीक्षेस बसू दिले जाणार नाही, याकरीता उमेदवारांनी भविष्याकरिता आवेदन शुल्क चलनाच्या मूळ स्थळ प्रतीच्या तीन छायांकित प्रती काढून त्या राजपत्रित अधिका-यांकडून सांक्षाकित करुन ठेवाव्यात .
8.9 उमेदवाराने ऑनलाईन अर्जाचा प्रिंट आऊट काढावा . त्यावर स्वतःचा पासपोर्ट आकाराचा नजिकच्या काळातील फोटो चिकटवावा आणि त्यांच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी जपून ठेवावा . परंतू सदरचा अर्ज बँकेकडे अथवा अन्य पत्त्यावर पाठविण्यात येवू नये . मूळ कागदपत्रांची पडताळणी मुलाखतीचे वेळी करण्यात येईल . त्यावेळी वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र यांच्या पृष्टर्थ जोडावयाच्या साक्षांकित प्रमाणपत्रासोबत उमेदवाराने सदर अर्जाचा प्रिंट आऊट सादर करावया आहे . त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केल्यास उमेदवारास निवडबाह्य ठरविले जाईल .
8.10 उमेदवारास www.akoladccbank.com संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र (Hall Ticket) डाऊनलोड (Download)> करावे लागेल . उमेदवारास e-mail द्वारे किंवा एसएमएस (SMS) द्वारे याबाबतची सूचना देण्यात येईल . तसेच लेखी परिक्षेत गुणवत्ताधारक मुलाखतीस पात्र उमेदवारास मुलाखतपत्र (Interview Letter)  टपालाने / e-mail द्वारे पाठविण्यात येईल . मुलाखतपत्रा बाबतची सुचना उमेदवारास e-mail / SMS द्वारे देण्यात येईल .
8.11 सहाय्यक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या पात्र उमेदवारांनी जाहिरातीत विहीत केलेले आवेदन शुल्क भरुन ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. सदर अर्ज न करण्यार्या उमेदवारांचा विचार केला जाणार नाही.
8.12 महत्वाच्या तारखा : -

www.akoladccbank.com संकेतस्थळावर अर्ज भरण्याची तारीख : -    
                                                                           25.4.2012 ते
                                                                           5.5.2012
        अर्ज स्विकारण्याची अंतीम तारीख                          5.5.2012
        उमेदवारास दुरुस्ती सुविधा तारीख                          7.5.2012
        कॉललेटर संकेत स्थळावर उपलब्ध तारीख                14.5.2012 पासून
परीक्षेची तारीख                                       20.5.2012 दु. 1 वाजता